डॉक्टरच्या घरी चोरी करणारी मोलकरीण गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घर विकत घेण्यासाठी डॉक्टरच्या घरी 20 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या मोलकरणीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. स्नेहल लोहार असे तिचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 18 लाख रुपये जप्त केले आहे. मालाड येथे राहणारे तक्रारदार हे डॉक्टर आहेत. साफसफाई आणि जेवण बनवण्यासाठी त्याने दोन महिलांना कामाला ठेवले आहे. स्नेहलकडे जेवण बनवण्याची जबाबदारी होती. हॉस्पिटलमध्ये जमा होणारी रक्कम ते घरात ठेवत होते. ही संधी साधून स्नेहलने  लॉकरमधून पैसे चोरले होते.