महाराष्ट्राच्या ज्युनियर्सची राष्ट्रीय खो-खोसाठी विमानवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे होणाऱया 43 व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ कारकीर्दीत प्रथमच विमानाने रवाना झाले. ही स्पर्धा 25 ते 29 नोव्हेंबरदरम्यान महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडियमवर रंगणार आहे.

धाराशीवचे भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे यांची अनुक्रमे कुमार आणि मुलींच्या संघासाठी कर्णधारपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंना विमानाने प्रवासाची सुविधा देण्यात आल्यामुळे  सर्व खेळाडूंच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहात होता.

ज्युनियर्स खेळाडूंनी लालबाग येथील ओम साईश्वर सेवा मंडळाच्या पटांगणात 17 नोव्हेंबरपासून आयोजित प्रशिक्षण शिबिरात कठोर मेहनत घेतली. यावेळी मंडळाचे श्रीकांत गायकवाड, नंदिनी धुमाळ, राजेश मोरे अस्मिता गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

महाराष्ट्राचे कुमार आणि मुली (ज्युनिअर) संघ ः कुमार गट ः भरतसिंग वसावे (कर्णधार), सोत्या वळवी, विलास वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे (सर्व धाराशीव), प्रज्वल बनसोडे, प्रेम दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), कृष्णा बनसोडे, शुभम चव्हाण (सर्व सोलापूर), आशीष गौतम (ठाणे), चेतन गुंडगळ, भावेश माशिरे (सर्व पुणे), अनय वाल्हेकर (अहिल्यानगर), प्रतीक जगताप (सातारा), प्रशिक्षक ः युवराज जाधव (सांगली), संघ व्यवस्थापक ः आकाश लोखंडे (धाराशीव).

मुली गट ः अश्विनी शिंदे, तन्वी भोसले, सुहानी धोत्रे (कर्णधार), प्रणाली काळे (धाराशीव), सानिका चाफे, प्रतीक्षा बिराजदार, धनश्री तामखडे (सांगली), प्राजक्ता बनसोडे, स्नेहा लामकाने (सोलापूर), दीक्षा काटेकर, धनश्री पंक (ठाणे), सुषमा चौधरी (नाशिक), दिव्या गायकवाड (मुंबई उपनगर), रिद्धी चव्हाण (रत्नागिरी), जोया शेख (जालना).

प्रशिक्षक ः श्रीकांत गायकवाड (मुंबई), संघ व्यवस्थापिका ः सुप्रिया गाढवे (धाराशीव).