
देशात सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. तसेच कोणतीही जोखीम नसलेली आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितले जाते. आता केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणार आहे. मार्च 2025 पर्यंत RBI ने 50 टन सोने खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जाणून घ्या यामागे नेमके काय कारण आङे.
रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवण्याचं धोरण RBI कडून अवलंबले जात आहे. मार्च 2025 च्या अखेरीस RBI ने एकूण 50 टन सोने खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे परकीय चलनाचा साठा वाढणार आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती बळकट करण्याचाही हेतू आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या खरेदीत वाढ केली आहे. परकीय चलनाच्या गंगाजळीचा महत्त्वाचा भाग म्हणून सोन्याचा साठ्याकडे बघितलं जाते. परकीय चलनाच्या साठ्याचा भाग म्हणून सोन्याचा साठा सप्टेंबरच्या अखेरीस विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखणे सोपे झाले आहे. रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबर 2023 दरम्यान 32.63 टन सोन्याची खरेदी केली आहे. अशाप्रकारे, मार्चमध्ये भारताचा सोन्याचा साठा 52.67 अब्ज डॉलरवरुन 65.74 अब्ज डॉलर झाला आहे. आता मार्चपर्यंत RBI ने 50 टन सोने खरेदीचे ध्येय ठेवले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही वाढ सुरुच आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करणं परवडत नाही. मोठ्या बँका, संस्था, सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच मोठ्या फायद्याची ठरते. या गुंतवणुकीतून चांगला मिळतो. त्यामुळं अनेक बँकांचा आणि संस्थांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. आगामी काळात सोन्या चांदीच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता RBI ने रुपयाच्या बळकटीसाठी सोनेखरेदीचे ध्येय ठेवले आहे.

































































