
अखेर रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन 18’ चा विजेता ठरला आहे. करणवीर मेहरा 18 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर विवियन डिसेना उपविजेता ठरला आहे. रविवारी रंगलेल्या महाअंतिम फेरीत सूत्रसंचालक सलमान खानने विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. विजेत्याला 50 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली.
टॉप 6 च्या शर्यतीत ईशा सिंग, चुम दरंग, अविनाश मिश्रा, रजत दलाल, करणवीर मेहरा आणि विवियन डीसेना होते. फिनालेमध्ये इशा सर्वातआधी बाहेर पडली. त्यानंतर चुम आणि नंतर अविनाश बाहेर पडले. रजत दलाल टॉप 3 मध्ये पोहोचला, पण त्याला टॉप 2 मध्ये स्थान मिळवता आले नाही.
दरम्यान, बिग बॉसचा हा प्रवास सुमारे 3 महिन्यांपूर्वी 6 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. करणवीर मेहरासाठी हे तीन महिने चढ-उताराचे होते. करणवीरच्या पर्सनल लाईफपासून ते त्याच्या घरातील जेवणापर्यंत अनेक राडे झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र अखेर तो विजेता ठरला आहे.





























































