
ठाण्याचे माजी महापौर तथा ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.ते 75 वर्षांचे होते. शांत, संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून राऊळ यांचा लौकिक होता. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे असा परिवार आहे.
ठाणे नगरपालिका असल्यापासून अशोक राऊळ यांनी नगरसेवकपद भूषवले होते. 1991-92 च्या काळात त्यांनी ठाण्याचे महापौरपद भूषवले होते. उत्कृष्ट वत्ते म्हणून त्यांची ओळख होती. महासभेतील त्यांची अनेक भाषणे गाजली.