आमदार धस यांनी केसाने गळा कापला – मनोज जरांगे पाटील

आम्ही विश्वासाने आमदार सुरेश धस यांच्या खांद्यावर मान टाकली, पण त्यांनी तर केसाने गळा कापला. क्रूर व्यक्तीला भेटणारा माणूसही क्रूरच! यापुढे त्यांना भेटणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे– पाटील यांनी आमदार सुरेश धस यांची पिसे काढली.

आष्टीमध्ये ज्या दिवशी हेलिकॉप्टर उतरले त्याच दिवशी काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला होता. परंतु आम्ही विश्वास ठेवला. एखादा माणूस आतून वेगळा आणि बाहेरून वेगळा असू शकतो हे पहिल्यांदाच बघायला मिळाले. मुळात ही भेट झालीच कशासाठी? ही गुप्त भेट ज्याने चव्हाटय़ावर आणली त्याचे कौतुक केले पाहिजे. त्याच व्यक्तीने खऱया अर्थाने मराठा समाज जागा केला, असे मनोज जरांगे म्हणाले.

एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा

अजितदादा म्हणतात धसमुंडे भेट माणुसकीच्या नात्याने

भाजप आमदार सुरेश धस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयाच्या भोवऱयात असलेले मंत्री धनंजय मुंडे यांची झालेली भेट माणुसकीच्या नात्याने झाली आहे. या भेटीचा कोणताही अन्वयार्थ काढू नये, असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बीडमधील अराजकाच्या केंद्रस्थानी असलेल्या धनंजय मुंडे यांना पाठीशी घातले.

आता ब्रह्मास्त्र काढण्याची वेळ आली – करुणा मुंडे

देशमुख हत्या प्रकरणाच्या गांभीर्य धोक्यात आले असून आता ब्रह्मास्त्र काढण्याची वेळ आहे या संर्दभात मुख्यमंत्री फडणवीस याची भेट घेणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्य़ा