
तक्रार करायला गेलेल्या रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात गाठून त्याला चौघे शिवीगाळ करत मारहाण करत होते. त्यावेळी वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण करणाऱ्यांनी धक्काबुक्की केली. त्यात अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाल्याची घटना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात घडली.
रिक्षा पार्क करण्याच्या वादातून शिवीगाळ व मारहाण झाल्याने रिझवान शेख हा तरुण सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यावेळी आशिष शर्मा व अन्य पाच जणांनी पोलीस ठाणे गाठले व आपल्याविरोधात तक्रार देतोस असे म्हणत रिझवानला शिवीगाळ करत मारहाण करू लागले. हा प्रकार लक्षात येताच उपनिरीक्षक साईनाथ पंतमवाड तसेच सपोनि भूषण मोरे, उपनिरीक्षक राहूल कोकाटे व गणेश हंसनाळे, सुरवसे हे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागले. तेव्हा आशिष व त्याच्या सोबत असलेल्या लोकांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केली. यात पंतमवाड, मोरे, हंसनाळे या सर्वांना दुखापत झाली.