पालिका पाळीव प्राण्यांची विष्ठा संकलित करणार, क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी पालिकेने सुरू केलेल्या कचरा संकलन सेवेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या अंतर्गत आता पाळीव प्राण्यांची विष्ठा व इतर विशेष कचऱयाची संकलनाची सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांना क्यूआर कोड स्पॅन करून विष्ठा संकलनासाठी नोंदणी करता येणार आहे.

पालिकेने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱयाचे संकलन’ (डॉमेस्टिक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) ही सेवा 22 एप्रिलपासून सुरू केली आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पाळीव प्राण्यांच्या विष्ठsचे संकलनदेखील या सेवेद्वारे करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज शनिवारपासून करण्यात आला. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱयाचे संकलन’ साठी यापूर्वीच ऑनलाईन लिंक आणि क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्येच पाळीव प्राणी विष्ठा संकलन सुविधेसाठी नोंदणी करता येईल.

पालिकेने त्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून दिली आहे किंवा विविध ठिकाणी उपलब्ध तसेच पालिकेच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेले क्यूआर कोड स्पॅन करून ही नोंदणी करता येईल.