पाकिस्तानची मुस्कटदाबी, हिंदुस्थानने बागलीहार धरणातून चिनाबचे पाणी थांबवले

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने वेगवेगळ्या प्रकारे पाकिस्तानची मुस्कटदाबी सुरू केली आहे. सिंधू करार रद्द केल्यानंतर आता हिंदुस्थानने पुन्हा एकदा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला आहे. हिंदुस्थानने चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून बागलीहार प्रकल्पातून हिंदुस्थानने पाणी सोडलेले नाही. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे.


जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार जलविद्युत प्रकल्पातील पाणी हा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वादाचा मुद्दा आहे. लवकरच आता हिंदुस्थान झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही असाच निर्णय घेऊ शकतो.