‘गोदावरी’ची दुर्दशा… गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी सूचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी टाळणार्या प्रशासनावर अवमान याचिका दाखल करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. नाशिकच्या आसाराम बापू आश्रमाजवळील पानवेलींनी व्यापलेले हे नदीपात्र महापालिकेची कर्तव्यदक्षता अधोरेखित करीत आहे. (छाया : भूषण पाटील)
जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षा…
जीवनदायिनी गोदावरीला प्रदूषणमुक्तीची प्रतिक्षा… प्रदूषणमुक्तीसाठी जनहित याचिका दाखल केली होती, न्यायालयाच्या आदेशानुसार ‘नीरी’ने सूचवलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मात्र, पानवेलींनी व्यापलेल्या नदीपात्राने प्रशासनाचे पितळ उघडे पाडले. तपोवनातील गोदावरी-कपिला संगम येथील नदीपात्र गाळाने असे खच्चून भरले आहे. (छाया : भूषण पाटील)
श्रद्धेला मोल नसते…
श्रद्धेला मोल नसते… नाशिकच्या गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडात देशभरातील भाविक स्नान करतात, तेथील पाणी श्रद्धेने तीर्थ म्हणून प्राशन करतात. थेट नदीत मिसळणार्या सांडपाण्याचे हे दृश्य चोपडा लॉन्स येथील आहे. गोदावरीसह तिच्या उपनद्यांची सर्वत्र हीच स्थिती आहे. निष्क्रिय शासन-प्रशासनाने भाविकांच्या श्रद्धेलाच मोल ठेवलेले नाही. (छाया : भूषण पाटील)