
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात हिंदुस्थानच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बैठकांवर बैठका घेत आहेत. काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष हिंदुस्थानवर आहे.
- बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, दोन हेडक्वॉर्टरला मंजूरी; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने काही राज्यांना मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. 7 मे रोजी हे मॉक ड्रिल घेण्यास सांगण्यात आले आहे.
- राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi arrives at Prime Minister’s Office, in Delhi. pic.twitter.com/jnbsHbYcs8
— ANI (@ANI) May 5, 2025
- पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉक येथील पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. थोड्याच वेळात उच्च स्तरीय बैठक
- गृहमंत्रालयाचे सचिव देखील पंतप्रधानांच्या भेटीला.
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
- रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाच्या प्रमुखांची भेट घेतली होती.