
फॅशन इंडस्ट्रीतील सर्वात मोठा इव्हेंट मेट गाला 2025 ला आता सुरुवात झाली. या सुप्रसिद्ध फॅशन शोसाठी बॉलीवूडचे अनेक कलाकार आपला डेब्यु देणार आहेत. या कलाकारांमध्ये सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी. कियारा आई होणार असल्याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावरून दिली होती. यानंतर ती कोणत्याही कार्यक्रमांमध्ये दिसली नाही. मात्र आता मेट गालाच्या स्पेशल इव्हेंटसाठी तिने हजेरी लावली आहे. तिचा यंदाचा लूक पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने यावर्षी मेट गालामध्ये अतिशय आकर्षक शैलीत पदार्पण केले. यावेळी अभिनेत्रीने रेड कार्पेटवर तिचा बेबी बंप फॉन्ट केला आहे. अभिनेत्रीचे मेट गाला 2025 चे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यावर्षी ब्लॅक डिझायनर गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या कियाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कियाराच्या ड्रेसच्या मागच्या बाजूला एक पांढरा कोट स्टाईलचा लांब ट्रेल जोडलेला दिसत आहे. हा गाऊन डिझायनर गौरव गुप्ताने डिझाइन केला आहे.
View this post on Instagram
कियाराच्या ड्रेसवरील हार्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कियाराने तिच्या पोटावर एक सोनेरी हार्ट लावले होते. तिच्या गाऊनवरील छातीपासून तिच्या पोटावरील हृदयापर्यंत सोन्याची साखळी जोडलेली होती. जशी बाळाची नाळ आईच्या हृदयाशी जोडते तशी ही कलाकृती ड्रेसवर तयार करण्यात आली आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी कियाराने मिनिमल मेकअप लूक केला होता. शिवाय हातात भरपूर अंगठ्या आणि कानात डँगलर इअररिंग परिधान केल्या होत्या. कियाराच्या बोल्ड अँड ब्युटीफूल लूकमुळे चाहते भारावून गेले आहेत. कियारा तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत या कार्यक्रमात पोहोचली आहे.
कियाराने तिच्या मेट गाला लूकमधील सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर तिने Mama’s first Monday in May असे कॅप्शन दिले आहे. कियाराचा नवरा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कियाराचा फोटो शेअर केला आहे.