
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आज पोलिसांकडून मॉकड्रिलचा सराव करण्यात येत आहे. RPF चे पथक, स्निफर डॉगसोबत हा मॉकड्रिल करण्यात आला.
#WATCH | Mumbai, Maharashtra | A mock drill rehearsal underway at the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) by the Central Railway.
The RPF team, with sniffer dogs and other gadgets and equipment, is conducting the rehearsal. pic.twitter.com/Mq1nrR7gNW
— ANI (@ANI) May 6, 2025
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. या वेळी सर्व राज्यांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजतील. सुरक्षा यंत्रणांना याबाबतचे आदेश देण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत नेमके काय करावे, याची माहिती नागरिकांना व्हावी या हेतूने देशभरात मॉकड्रील होणार आहे. नागरी सुरक्षा अभ्यासाचा भाग म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. शत्रूच्या हल्ल्याप्रसंगी स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील या 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील-
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंंधुदुर्ग