Air Force exercise हवाई दल पाकिस्तान सीमेलगतच्या वाळवंटी भागात करणार युद्धाभ्यास

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या मोठ मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उद्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉकड्रील केले जाणार आहे. तसेच हिंदुस्थानी हवाई दलाकडून उद्या सीमेलगतच्या वाळवंटी भागात युद्धाभ्यास केला जाणार आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती ANI ला दिली आहे. या हवाई अभ्यासाची नोटीस हवाई दलाकडून जारी करण्यात आली आहे.

हिंदुस्थान पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या वाळवंटी भागात हा युद्धाभ्यास होणार आहे. यात हिंदुस्थानी हवाई दलातील मुख्य लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. यात राफेल, मिराज 2000 आणि सुखोई 30 या सहीत इतर लढाऊ विमानांचा समावेश आहे, अशी माहिती ANI ने दिली आहे.

7 मे रोजी 295 जिल्ह्यात होणार मॉकड्रील

हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने बुधवारी राज्यात सिव्हिल डिफेंस मॉकड्रीलचे आदेश दिले आहेत. देशातील 295 जिल्ह्यात मॉकड्रील केले जाणार आहे.