
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर धाडसी आणि निर्णायक कारवाई करून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या हिंदुस्थानी सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या भूर सैनिकांच्या धाडसाला, दृढनिश्चयाला आणि देशभत्क्तीला आम्ही सलाम करतो, अशा भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केल्या आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसने लष्कर आणि सरकारसोबत एकता दाखवली. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक निर्णायक कारवाईला पाठिंबा दर्शवला, असेही त्यांनी नमुद केले आहे.

























































