Operation Sindoor – दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही – राज ठाकरे

दहशतवाद्यांना धडा शिकवलाच पाहिजे. मात्र दहशतवादी हल्ल्याला उत्तर युद्ध नसतं. दहशतवाद्यांनी अमेरिकेत ट्वीन टॉवर्स पाडले म्हणून अमेरिकेने युद्ध केले नाही. त्यांनी ते दहशतवादी ठार मारले, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आपण थोडा आपलाही विचार करणे आवश्यक आहे. पाकिस्तानला आपण काय बरबाद करणार, तो आधीच बरबाद झालेला देश आहे, असे नमूद करताना ‘ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ते अजून सापडलेले नाहीत, ज्या पर्यटन स्थळावर हल्ला झाला तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत,’ असे राज ठाकरे यांनी नमूद केले.