2040 पर्यंत हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर उतरणार

देशाची पहिली मानवासहित अंतराळ मोहीम ‘गगनयान’ ही देशाच्या अंतराळ तंत्रज्ञानातील वाढत्या आकांक्षांचे प्रतीक आहे. पुढील काही आठवडय़ांमध्ये ‘इस्रो’ आणि ‘नासा’ यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत एक हिंदुस्थानी अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. तसेच 2040 पर्यंत हिंदुस्थानी अंतराळवीर चंद्रावर पाऊलखुणा सोडेल. चंद्राव्यतिरिक्त मंगळ आणि शुक्रदेखील आपल्या रडारवर आहेत, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषदेत सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, हिंदुस्थानसाठी अंतराळ केवळ शोधापुरते मर्यादित नाही, तर ते सक्षमीकरणाचे माध्यम आहे.