
हिंदुस्थानी सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला पडद्यावर दाखवण्यासाठी बॉलिवूडमध्ये स्पर्धा लागली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’शी निगडीत टायटल मिळवण्यासाठी बॉलिवूडमधील कित्येक जण उत्सुक आहेत. अभिनेता जॉन अब्राहिम, सुनील शेट्टी आणि आदित्य धर यांनी सिनेमा बनवण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘मिशन सिंदूर’ और ‘सिंदूर ः द रेवेंज’, अशी नावे नोंदवली आहेत. इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ूसर्स असोसिएशन (इम्पा), इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोडयूसर्स कौन्सिल आणि वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोडयूसर्स असोसिएशन यांना ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित चित्रपटांच्या टायटल नोंदणीसाठी जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.


























































