बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदाकडून ऑफिस असिस्टंट/शिपाई पदांच्या 500 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अखेरची तारीख 23 मे 2025 आहे. ही भरती संपूर्ण देशभरातील बँकेसाठी केली जाणार असून यात महाराष्ट्रासाठी 29 पदे राखीव आहेत. गुजरातमध्ये 80, तर उत्तर प्रदेशात 83 पदे भरली जाणार आहेत. बाकीच्या राज्यांतसुद्धा ही भरती केली जात असून उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिपृत वेबसाईट bankofbaroda.in वर देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेत काम करण्याची संधी असून अधिकाधिक तरुण-तरुणींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.