
येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱया नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी 225 रुपये तर उर्वरित विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.