हिंदुस्थानी फौजांचा आवाज रावळपिंडीपर्यंत पोहोचला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरन राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची दाणादाण उडवून दिली. हिंदुस्थानी फौजांचा आवाज रावळपिंडीपर्यंत पोहोचला असे विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

एका कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हिंदुस्थानी सैन्यांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. हे ऑपरेशन राबवून हिंदुस्थान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे असा संदेश दिला आहे. तसेच पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं. हिंदुस्थानी सैन्याने फक्त पाकिस्तानातील दहशतवाद्यांना लक्ष्य केलं. पण पाकिस्तानी सैन्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला. तसेच त्यांनी मंदिर मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चेसवरही हल्ला केल्याचे सिंह यांनी सांगितले.

हिंदुस्थानने फक्त पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हल्ले नाही केले. तर हिंदुस्थानी लष्कराचा आवाज रावळपिंडीत ऐकला गेला जिथे पाकिस्तानच्या सैन्याचे मुख्यालय आहे.

हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले केल्यास काय होऊ शकतं हे आम्ही उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईक ककरून दाखवलं आहे असेही राजनाथ सिंह म्हणाले.