तुर्की आणि अजरबैजान देशांत जाऊ नका

हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्की आणि अजरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मनी तुर्की आणि अजरबैजान या दोन्ही देशांचे तिकीट बुकिंग रद्द केलंय. तसेच प्रवाशांसाठी अॅडवायजरी जारी केली आहे. या दोन्ही देशांमध्ये हिंदुस्थानी प्रवाशांनी जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवाशांना अधिक सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात येत आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म कॉक्स अँड किंग्ज या कंपनीने अजरबैजान, उज्बेकिस्तान आणि तुर्कीसाठीचे सर्व तिकीट बुकिंग काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इजमायट्रिप या कंपनीनेही प्रवाशांसाठी ट्रव्हेल अॅडवायजरी जारी केली. ट्रावोमिंट या कंपनीनेही या दोन्ही देशांचे टुर्स पॅकेज रद्द केले आहे.