
रत्नागिरी तालुक्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देहविक्रीसाठी चार महिला आणल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.
खेडशी येथील गौरव लॉजमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक डमी गिऱ्हाईक पाठवून गौरव लॉजवर छापा टाकला. त्या लॉजवर देहविक्री करण्यासाठी चार महिला आणल्याचे निष्पन्न झाले. कोकण नगर येथील आरोपी अरमान करीम खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
रायगडातील सागरी सुरक्षारक्षकांची ससेहोलपट, किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारच गंभीर नाही
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव,सहायक पोलीस फौजदार सुभाष भागणे, हवालदार नितीन ढोमणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, वैष्णवी यादव यांनी ही कारवाई केली.