Operation Sindoor – पाकिस्तान भिकारी नंबर 1! राजनाथ सिंहांनी चित्रपटाचा डायलॉग सांगत घेतला समाचार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांनी लष्करातील जवानांशी संवाद साधला. यावेळी राजनाथ सिंह यांची पाकड्यांची लायकीच काढली. ‘हम जहां खडे होते हैं, लाइन वहीं से शुरू होती है…’ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा हा फेमस डायलॉग आहे आणि आजही लोक तो डायलॉग बोलतात. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

पाकिस्तानबद्दल बोलू. मागत मागत अशा स्थितीत पाक पोहोचला आहे की, पाकिस्तान जिथे उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरू होते. तुम्ही नुकतेच ऐकले असेल की पाक पुन्हा एकदा कर्ज मागण्यासाठी आयएमएफकडे गेला. दुसरीकडे हिंदुस्थानचा समावेश आज अशा देशांमध्ये जे आयएमएफला निधी देतात जेणेकरून आयएमएफ गरीब देशांना कर्ज देऊ शकेल, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला.

पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीत ठेवावीत, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. पाकिस्तानकडून यापुढे कुठलीही नापाक घटना होणार नाही, यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. पण असे घडल्यास ‘बात दूर तक जाएगी’, असा थेट इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला.

अ‍ॅपलने हिंदुस्थानात Iphone बनवू नयेत, ट्रम्प यांचा सीईओ टिम कुकना आदेश

राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमधील बादामी बाग छावणीत जवानांशी संवाद साधला. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही उपस्थित होते. IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने पाकिस्तानची अण्वस्त्रे आपल्या देखरेखीखाली घ्यावीत, जगाला माझा हा प्रश्न आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. शहीद जवानांना आणि पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकाना श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

Operation Sindoor – 4 दिवसांत हिंदुस्थानने पाकड्यांना धुळ चारली, मोठी हानी झाली; न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

आम्ही त्यांच्या आण्विक ब्लॅकमेलची पर्वा केली नाही. पाकिस्तानने अणुहल्ल्याची अनेकदा धमकी दिली आहे. अशा बेजबाबदार देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? जगाला माझा हा सवाल आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.  दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांना मारले. त्यानंतर आपण दिलेले उत्तर संपूर्ण जगाने पाहिले. दहशतवाद्यांनी हिंदुस्थानींना धर्माच्या आधारे मारले, आम्ही त्यांच्या कर्माच्या आधारे मारले, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.