Weather Forecast – तो येतोय बरं का…! हवामान विभागाने दिला पुढच्या 4 आठवड्यांचा अंदाज

राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक भागात पावसाची कोसळधार सुरू आहे. पावसाचा जोर पुढील 4-5 दिवस असाच राहिल, तसेच जोरदार वारे देखील वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाना पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत या बाबत माहिती दिली आहे.

पुढील 4-5 दिवसांत मेघगर्जने दरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडाखाली उभे राहू नका, तसेच सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

१५ मे, बिगी बिगी तयारी करा पावनंं, तो येतोय बरं का…
🌨🌨🌦🌱🌈☔☔
येत्या 4 आठवड्यातील पावसाचे विस्तारित पूर्वानुमान: pic.twitter.com/7sI5Dox1gf

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2025

पुढील चार आठवड्यांचा काय आहे अंदाज?