
गुजरातमधील जामनगरजवळ दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात बसण्यावरून झालेल्या वादानंतर दोन प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याने 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी जामनगर रेल्वे पोलिसांनी हाजी अय्युब कछडिया या आरोपीला अटक केली. तसेच सहआरोपी सद्दाम कछडियाचा शोध सुरू आहे. हितेश मिस्त्री असे मृत प्रवाशाचे नाव असून त्याचा मृतदेह जामनगरजवळील गुलाबनगर रेल्वे ब्रीजजवळ आढळून आला. मिस्त्री हा वडोदरा येथील रहिवासी होता. मिस्त्री मंगळवारी रात्री सौराष्ट्र एक्स्प्रेसने पोरबंदरहून मित्रासोबत घरी परतत असताना ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी गायब झाले.