छत्तीसगडमध्ये CRPF च्या श्वानावर मधमाशांचा हल्ला, रोलोचा दुर्दैवी मृत्यू

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यातील श्वानावर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात या श्ववानाचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफची एक तुकडी नक्षलवाद्यांनी पेरलेले IED बॉम्ब शोधत होते. तेव्हा त्यांच्यासोबत दोन वर्षांची रोलो नावाची बेल्जिय शेपर्ड या जातीची मादा श्वान होती. बॉम्बचा शोध घेताना अचानक जंगलात मधमाशांनी हल्ला केला. तेव्हा जवानाने प्लॅस्टिकच्या पिशवीने रोलोला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच काही मधमाश्या रोलोच्या त्या पिशवीत शिरले आणि तिला चावल्या. या वेदना असह्य झाल्याने रोलोची तडफड झाली आणि तिची पिशवी सटकली. त्यात बाकीच्या मधमाश्यांनी आणखी रोलोवर हल्ला केला. त्यानंतर रोलो गंभीर जखमी झाली आणि बेशुद्ध झाली. रोलोवर तातडीने उपचार करण्यात आले पण त्यात रोलोचा मृत्यू झाला.