दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 23 जणांना बेड्या, जम्मू कश्मीरमध्ये मोठी कारवाई

जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर सैन्य अॅक्शन मोडमध्ये आले असून खोऱ्यात अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सैन्याने आतापर्यंत 6 दहशतवाद्याना कंठस्नान घातले असून 14 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. तसेच दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी सैन्य दलाने आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. श्रीनगर पोलसांनी शनिवारी दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी 23 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना तुरुगांत टाकले असून पुढील चौकशी सुरू आहे.

या 23 आरोपींनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे निष्पण्ण झाले आहे. या आरोपींनी दहशतवाद्यांना सर्वतोपरी मदत केल्याचे समोर आले आबहे. देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी यांना अटक केली असून सर्व आरोपींचे वय हे 18 ते 22 दरम्यान आहे.