
अवकाळी शनिवारी सायंकाळी पावसाने चाकूर शहराला चांगलेच झोडपले. या अवकाळी पावसामुळे नगरपंचायत च्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. एका अवकाळी पावसाने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
अवकाळी पावसामुळे नाले सफाई चे काम न झाल्यानेच नाल्यातील घाण रस्त्यावर आली. त्या घाणीमुळे शहरात दुर्गंधी पसरली असून चाकूर येथील नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई चे काम पूर्ण न झाल्याने या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार हा वेगाने होतो. अगोदरच डासांचे प्रमाण जास्त झाले आहे. त्यातच ही घाण त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाली पेक्षा रस्त्यावरूनच पाणी वाहण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे काही काळ नाली की रस्ता अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे नाले सफाई चे काम वेळेवर होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. याचा त्रास मात्र स्थानिक नागरिकांना होत आहे. वाहनधारकांना देखील वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. वृद्ध तसेच नागरिक या पाण्यातून वाट शोधत जात होते. या पाण्यामुळे उजळंब रोडवरील घरांमध्ये नालीचे पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांचे नुकसान झाले आहे.