
जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता. त्यानंतर देशातल्या तपास संस्था सक्रिय झाल्या आहेत. सुरक्षा संस्थानी ऑपरेशन सिंदूरनंतर 8 मे पासून 10 जणांना हेरगिरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींनी हिंदुस्थानची संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप या दहाजणांवर आहे.
पंजाबमधून गजाला आणि यमीन मोहम्मदला अटक
पोलिसांनी सर्वात आधी पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मदच्या मुसक्या आवळल्या आहेत. नवी दिल्लीतील पाकिस्तान वकिलातमध्ये काम करणारा दानिश या दोघांना भेटायचा अशी बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर दानिशने या दोघांना ऑनलाईन पैसेही पाठवल्याचे समोर आले आहे.
हरयाणातून नोमान इलाहीला अटक
14 मे रोजी पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नोमान इलाहीला अटक केली आहे. नोमान पाकिस्तानच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्कात होता, त्यांना नोमानने संवेदनशील माहिती दिली होती.
हरयाणातून देविंदर सिंह ढिल्लोंला अटक
हरयाणाच्या कैथल जिल्ह्यातून देविंदर सिंह ढिल्लोंला अटक करण्यात आली आहे. देविंदर सिंहने हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला माहिती दिली आहे. देविंदर सिंह हा पाकिस्तानमधील करतारपूर साहिब, ननकाना साहिब या धार्मिक ठिकाणी भेटी दिल्या. तेव्हा तो ISI च्या संपर्कात आला होता.
नूहमधून अरमानला अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नूहमधून अरमानला अटक करण्यात आल आहे. अरमान व्हॉट्सअॅपवरून पाकिस्तानला माहिती पुरवत होता. पोलिसांनी या प्रकरणी अरमानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
पूरीमधन युट्युबर प्रियंका सेनापतीची चौकशी
पुरी येथे राहणारी युट्युबर प्रियंका सेनापतीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ज्योती मल्होत्रा पुरी येथे गेली होती आणि दोघींची भेट झाली होती. ज्योतीने केलेल्या हेरगिरीत प्रियंकाने काही मदत केली होती की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.
युट्युबर नवांकर चौधरीवर आरोप
युट्युबर नवांकर चौधरीवरही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचे आरोप आहेदत. चौधरीने आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
उत्तर प्रदेशमधून शहजादला अटक
उत्तर प्रदेशमधून व्यावसायिक शहजादला मुरादाबादमधून अटक केली आहे. शहजादने राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवले होते.
जालंधरमधून मोहम्मद मुर्तजा अलीला अटक
गुजरात पोलिसांनी जालंधरमधून मोहम्मद मुर्तजाला अटक केली आहे. मुर्तजा हा ISI साठी हेरगिरी करायचा, त्याच्याकडून चार मोबाईल आणि तीन सिम कार्ड जप्त केले आहेत.
ज्योती मल्होत्राला पोलिसांकडून अटक
युट्युबर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानला गेली होती. ज्योती पाकिस्तानच्या वकिलातात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. दानिशला हिंदुस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.