पहलगाम हल्ल्याच्या आधीच गुप्त माहिती मिळाल्यानंतर PM मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला होता – मल्लिकार्जुन खर्गे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवस आधी गुप्तचर अहवाल मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला होता, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. कर्नाटकमधील समर्पण संकल्प रॅलीला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा आरोप केला आहे. ऑपरेशन सिंदूर हे लहान युद्ध आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरोप केला आहे की, “मोदी सरकारने पर्यटकांना सुरक्षा न दिल्याने काश्मीरमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. गुप्तचर यंत्रणांनी त्यांना न जाण्यास सांगितले म्हणून मोदी काश्मीरला गेले नाहीत. तुम्ही (केंद्र सरकारने) पर्यटकांना तिथे (पहलगाम) न जाण्यास का सांगितले नाही? जर तुम्ही त्यांना सांगितले असते तर 26 जणांचे जीव वाचू शकले असते.”