
धुळ्यातील सरकारी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांची वसूली सुरू असल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. विश्रामगृहातील वसूलीची माहिती मिळताच धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक मारली. मात्र त्या मंत्र्यांचा खासगी सचिव खोलीला टाळं लावून पळून गेले. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले आहे.
महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे?
धुळे विश्राम गृहात (no 102) राज्याच्या एका कैबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती.
आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पी ए खोलीस लॉक लावून पळून गेले.
खोलीत किमान ५ कोटी रुपये आहेत.…— Sanjay Raut (@rautsanjay61) May 21, 2025
”महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? धुळे विश्राम गृहात (no 102) राज्याच्या एका कैबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत. कलेक्टर च्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे. पण सगळेच पळ काढत आहेत,चोरांचे सरकार चोरांना सरंक्षण, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांनी त्यानंतर आणखी एक ट्विट करत सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. ”विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता , या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथे रूम नंबर 102 मध्ये जमा करण्यात आले होते. त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप आलेला नाही, प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही आहे. विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार त्यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत! उद्धव ठाकरे यांचे सरकार का पाडले? हा असा महाराष्ट्र लुटण्या साठीच, असे राऊत यांनी ट्विट केले आहे.