बोरिवलीत स्कायवॉकला भीषण आग

बोरिवली स्टेशनच्या पश्चिमेकडील बाजूला लागून असलेल्या स्कायवॉकला संध्याकाळी 7.30 वाजताच्या समुराला अचानक मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. स्कायवॉकमधून आगीच्या ज्वाळा खाली पडत असल्याने स्थानकातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग नेमकी कशामुळे लागली, यासंदर्भात बोरिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.