
जम्मू कश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाही हल्ला होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. पण अद्यापही या हल्ल्यातील दहशवादी मोकाट आहे. मात्र देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानविरुद्धचा राग कमी होताना दिसत नाही. याचाच एक प्रत्यय राजस्थानमध्ये आला. जयपूरच्या मिठाईवाल्याच्या एका निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचे कौतुक केले जात आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरच्या मिठाई व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला त्यांच्या खास शैलीत उत्तर देण्याचा एक अनोखा निर्णय घेतला आहे. राजे महाराजांचे शहर असलेल्या जयपूरमधील लोकांना गोड पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. त्यामुळे शहरात शेकडो मिठाईची दुकाने आहेत. जयपूरच्या सर्व प्रसिद्ध मिठाईंला पाक हा शब्द जोडला जातो. गोंड पाक, म्हैसूर पाक, मावा पाक, अंजीर पाक, काजू पाक, देसी पाक अशी या मिठाईची नावे आहेत. दरम्यान पहलगाम हल्ल्यामुळे आणि त्यानंतर हिंदुस्थानने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीमुळे जयपूरच्या मिठाईवाल्यानी मोठा निर्णय घेतला.
जयपूरच्या मिठाईवाल्याने ज्या मिठाईंशी पाक हा शब्द जोडला होता त्यांची नावे बदलली आहेत. त्यामुळे आतापासून या मिठाईला पाकऐवजी श्री आणि भारत हे शब्द जोडले जाणार आहेत. त्यामुळे गोंड पाकचे नाव बदलून आता गोंडश्री करण्यात आले आहे. म्हैसूर पाकचे नाव बदलून म्हैसूरश्री करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनीही या मोहिमेचे कौतुक केले आहे.
आत्तापासून पाक या शब्दाचा वापर असलेली कोणतीही मिठाई आपण खाणार नाही, असा निश्चय ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे जयपूरच्या व्यापाऱ्यांची ही मोहिम लवकरच देशाच्या इतर भागातही अवलंबली जाईल असे दिसून येत आहे.