
कालच्या घसरणीनंतर शुक्रवारी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 769 अंकांनी वाढून 81,721 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 243 अंकांनी वाढून 24,853 अंकावर बंद झाला. बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 442.08 लाख कोटींवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.90 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्स वाढीसोबत बंद झाले. यात भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली.