
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हिंदुस्थानने पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवला. दहशतवाद्याचा बीमोड केल्याशिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबणार नाही, असा इशारा हिंदुस्थानने दिलाय. हिंदुस्थानी लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा दरारा अवघ्या जगाने पाहिला. ‘आकाशतीर’ या एअर डिफेन्स सिस्टीमने तर तुर्कीच्या ड्रोन्सला हवेत उद्ध्वस्त केले.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) ‘आकाशतीर’ सिस्टीमसाठी खास नियोजन आखलंय. ‘‘निश्चितच आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने चांगली कामगिरी केलीय आणि मला विश्वास आहे की, अन्य देशांनाही यामध्ये स्वारस्य वाटेल,’’ असा विश्वास डीआरडीओचे प्रमुख समीर कामत यांनी व्यक्त केला.
‘आकाशतीर’ पूर्णपणे ऑटोमेटेड, मोबाईल एअर डिफेन्स कंट्रोल आणि रिपोर्टिंग सिस्टीम आहे. वेगवेगळे रडार, सेन्सर आणि कम्युनिकेश सिस्टीमला जोडून शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि मिसाईलचा शोध घेऊन, त्यांचा ट्रक ठेवून त्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. ‘आकाशतीर’ म्हणजे हिंदुस्थानची स्वदेशी संरक्षण क्षमता मजबूत झाल्याचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.