SIT म्हणजे डोळ्यात धुळफेक, सोयिस्कररित्या तयार केलेली कमिटी… धुळे वसूली कांडावरून अनिल गोटेंची फडणवीसांवर टीका

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील सत्ताधारी आमदारांच्या वसुलीचा भंडाफोड शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.या वसुली ‘जालना’कांडांच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी SIT चौकशीचे आदेश दिले आहेत.त्याबाबत बोलताना शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

”माझा चौकशी समितीवर विश्वास नाहीए. एसआयटी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी आहे.मंत्री जयकुमार रावल यांच्या बँक घोटाळ्या संदर्भात SIT नेमली आहे. त्री जयकुमार रावल यांच्या विरोधातील सर्व पुरावे मी देशाचे पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, , गृहमंत्री यांच्याकडे पाठवलेले आहेत. परंतु, त्याची अद्याप दखलही घेतलेली नाही. त्यामुळे या चौकशी समित्यांवर माझा विश्वास नाही, असे अनिल गोटे म्हणाले.

तसेच जर सरकारला खरंच चौकशी करायची असेल तर प्रवीण गेडाम , त्याचबरोबर तुकाराम मुंडे व धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, असे गोटे यांनी सांगितले.