चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोली सीमेवरील जंगलात भरपावसात 36 तास शोधमोहीम

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि छत्तीसगड सीमावर्ती भागातील कवंडे पोलीस मदत केंद्रापासून जवळ असलेल्या जंगलात सुरक्षा दले आणि पोलिसांनी संयुक्तपणे भरपावसात तब्बल 36 तास नक्षलवाद्यांची शोधमोहीम राबवली. यादरम्यान उडालेल्या चकमकीत आज चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून ते नक्षलवादी उपकमांडर दर्जाचे असल्याची माहिती समोर आली आहे.

तब्बल 300 जवानांनी नक्षलवाद्यांना घेरून त्यांची काsंडी केली होती. स्वयंचलित रायफल, एफ 303 रायफल, वॉकीटॉकी आणि अन्य साहित्य तसेच शस्त्रसाठा पोलिसांनी कारवाईत जप्त केला. 21 मे रोजी छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवादाचा कणा असलेला नक्षलवाद्यांचा टॉपचा नेता नंबला केशव राव ऊर्फ बसवराजू याच्यासह 27 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तेव्हापासून नक्षलवाद्यांची सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी पळापळ सुरू आहे.