‘ऑपरेशन सिंदूर’मधील महिला अधिकारी पदावर राहणार कायम

‘ऑपरेशन सिंदूर’मधील कामगिरीचे कौतुक करतानाच सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानच्या हवाई दलातील विंग कमांडर निकिता पांडे यांना मोठा दिलासा दिला. पुढील आदेश देईपर्यंत हवाई दलाने त्यांची सेवा स्थगित करू नये, असे सांगतानाच या प्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. निकिता पांडे यांना कायमस्वरुपी कमिशन नाकारल्यानंतर त्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय हवाई दलाने घेतला होता. या निर्णयाला पांडे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.