
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशी सैन्याच्या धसक्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. राजकीय संकटामुळे आणि पक्षांत एकमत नसल्यामुळे ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. नॅशनल सिटीझन पार्टी प्रमुख नाहिद इस्लाम यांनी मुलाखतीत याबाबतचा दावा केला आहे. दिवसभर युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. गुरुवारी युनूस यांना भेटायला गेलो होतो. सर म्हणाले की ते राजीनाम्याचा विचार करत आहेत. त्यांना असे वाटते की, सध्याच्या परिस्थितीत काम करणे शक्य नाही, असे नाहिद यांनी म्हटले आहे.