ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लघुउद्योजिका सुनीता शिंदे यांचे निधन!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लघुउद्योजिका सुनीता शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा एकनाथ, सून, मुलगी विजया कोरगावकर, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मुंबईतल्या वंचित वस्त्यांमध्ये शेकडो बालवाड्या चालवून त्यांनी हजारो मुलांची शैक्षणिक आणि आरोग्य विकासाची पायाभरणी केली. त्याच काळात शालेय गणवेश आणि अगरबत्ती उत्पादनांचा व्यवसाय विस्तारून अनेक गरजू महिलांना रोजगार मिळवून दिला. ‘सेव्ह दी चिल्ड्रेन इंडिया’ संस्थेत त्या वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या होत्या. सुमेध वडावाला लिखित ‘पुस्तक उघडलं’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाद्वारे त्यांचा जीवनसंघर्ष समोर आला. अखेरच्या काळात त्यांनी देवगडमधील शिरगावात प्रयोगशील शेतकरी म्हणूनही काम केले.