हेरगिरी केल्याचा आरोप; भंगार विक्रेत्याला अटक

हेरगिरी केल्याच्या आरोपात दिल्लीतील सीलमपूर येथील भंगार विक्रेता मोहम्मद हारून (45) याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने तो त्याच्या दुसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी पाकिस्तानला जात असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. बुधवारी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हारूनच्या मुसक्या आवळल्या. तो पाकिस्तानी एजन्सीच्या संपर्कात होता आणि हिंदुस्थानातील अंतर्गत सुरक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती त्यांना दिली असल्याचा आरोप एटीएसने केला.