वाल्मीक कराडची चाकरी करणाऱ्या कारागृह अधीक्षकांची उचलबांगडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात असलेल्या वाल्मीक कराडची चाकरी करणारे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनीही कराडचा कारागृहात व्हीआयपी पाहुणचार करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

बीड कारागृहाचे अधीक्षक बक्सार मुलानी यांची आज तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर रत्नागिरीहून रामराजे चांदणे येणार आहेत. वाल्मीक कराडचा पाहुणचार करणे मुलानी यांना भोवल्याची चर्चा आहे. मुलानी हे गेल्या तीन वर्षांपासून बीड येथे कार्यरत होते. कराडशी असलेली जवळीकच त्यांना भोवल्याचे स्पष्ट झाले आहे.