Chandrapur: घरकुलसाठीची मोफत रेती आणायला गेले दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतले; लाभार्थी हतबल

GharKul Beneficiaries Helpless After Failed Free Sand Collection Drive

यंदा मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाले मात्र रेती घाटांचे लिलाव रखडल्याने घरकुल बांधकामाचे काम बंद अवस्थेत पडले होते 22 मे पासून पाच ब्रास रेती लाभार्थ्यांना मोफत देण्याचे धोरण सरकारने आखले. मात्र ही योजना आता फक्त कागदोपत्री दिसत असून प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील 55 लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती देण्याचे शासनाने ठरवले. त्यानुसार महसूल विभागाचे कर्मचारी सकाळी शासनाने रेती उत्खननासाठी ठरवून दिलेल्या तारडा कुलथा शेतशिवारातील 229 सर्वे नंबर येथे लाभार्थी, मजूर, नोंद केलेल्या ट्रॅक्टर पोहोचल्या मात्र मान्सून पूर्व पाऊस आला नाही नेमून दिलेल्या सर्वे नंबरच्या परिसरात पावसामुळे अडचण निर्माण झाली आहे. पावसामुळे ट्रॅक्टर फसत असल्याने अखेर लाभार्थी रिकाम्या हातानेच घरी परतले. सकाळी 6 पासून रेती काढण्यासाठी प्रयत्न केले असता सायंकाळपर्यंत एकही ब्रास रेती बाहेर न निघाल्याने अखेर रिकामे ट्रॅक्टर व घरकुल लाभार्थी हिरमोड होऊन संताप व्यक्त करत घरी परतले.

एकीकडे शेतीचा हंगाम सुरू असून दुसरीकडे मात्र शासन 9 जून पर्यंत रेती नेण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी हा दुहेरी संकटात सापडलेला आहे. शेतीची मशागत करायची की घरासाठी रेती न्यायची प्रश्न नागरिकांकडून निर्माण झाला असून पावसामुळे रेती उपसा करणे कठीण झाले असून मोफत रेती योजना डोखेदुखी ठरत आहे. ज्या रेती घाटातून रेती निघेल त्या घाटातून रेती नेण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी आता घरकुल लाभार्थ्यांकडून केल्या जात आहे.

(GharKul Beneficiaries Helpless After Failed Free Sand Collection Drive)