
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील श्री रामलिंग-चौडेश्वरी यात्रेला ऐतिहासिक परंपरा आहे. या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेले बाळबट्टल पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातील भाविकांचा महापूर लोटला होता. रात्री १२ वाजता सुरु झालेली मिरवणूक सकाळी साडेआठपर्यंत चालली.श्री मद्विरशैव देवसाली हटगार कोष्टी समाजाचे श्री रामलिंग चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या संपूर्ण जबाबदारीखाली यात्रेतील सर्व माननिकऱ्यांना मान देण्यात आले. सर्व जातीधर्माना यात्रेमध्ये सहभागी करून घेऊन वैभवशाली यात्रा करण्याची परंपरा कायम राखण्यात आली.
बाळबट्टलच्या सुरुवातीला वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल सनगल्ले यांना यात्रेला सुरक्षा देण्यासाठी तिसऱ्यांदा विडा देण्यात आला. त्यानंतर देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ व मानकऱ्यांनी मशाल लावून वाजत-गाजत मंदिराकडे देण्यात आले. मंदिरात ते पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. सगळे विधी पार पडल्यानंतर बाळबट्टल मिरवणुकीला सुरुवात झाली. या यात्रेत वळसंग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मान असून, तो मान पूर्वीपासूनच आहे. याला पण इतिहास आहे. हा मान यंदा प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांनी तिसऱ्यांदा मिळविले.
300 वर्षापूर्वी कर्नाटकातील माशाळ येथील चांदीची वाटी पळवून आणलेल्या इरण्णा यांच्या समाधीला नैवेद्य देऊन बाळबट्टलचा प्रारंभ करण्यात आला. वामनायक, नरसिंह, बाळबट्टल कुंभ, पालखी मिरवणूक, रथपूजा तसेच बाळबट्टल सांभाळण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेण्याची प्रथा आहे. या बाळबट्टल सुरक्षाकरिता वळसंग पोलीस ठाण्याचा मोठा बंदोबस्त होता.सर्व समाजाचे प्रतिनिधी मानकरी वळसंगच्या रामलिंग चौडेश्वरी यात्रेला ऐतिहासिक परंपरा आहे. यात भक्तीची भर पडली असून, ब्रिटिश काळापासून ही यात्रा चालते. या यात्रेत वळसंगमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व समाजाला मान आहे. त्या त्या समाजाचे प्रतिनिधी आणि कुटुंब प्रमुख यात्रेत सहभागी होऊन यात्रेतील विधी पार पाडतात.यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना मान देण्यात आला. यात्रा यशस्वी होण्यासाठी देवी भक्ताकडून व स्थानिक नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याची माहिती ट्रस्टी अध्यक्ष चनबसप्पा खैराटे यांनी सांगितले.
Valasang’s Chowdeshwari Yatra: Devotees Flood to Witness Baalbattal Procession