चार किलो गांजा विकताना मनसे उपाध्यक्षाला अटक

गांजा विक्री करणाऱ्या मनसे उपाध्यक्षाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कुमार पुजारी (34) असे अटक केलेल्या मनसे उपाध्यक्षाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी जवळपास चार किलो गांजा जप्त केला आहे.

कोंबडपाडा येथील मोकळ्या मैदानात एक जण गांजा विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 3 किलो 960 ग्रॅम गांजा व 1 लाख 28 हजार रुपये मिळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो मनसेचा भिवंडी शहर उपाध्यक्ष असल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने कुमार पुजारीविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.