
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, पती शशांक व नणंद करिष्मा यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर गुरुवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान या सुनावणीनंतर हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी लता व करिष्मा यांच्या जामीनासाठीा अर्ज केल्याचे समजते.

























































