
उत्तर मुंबईत ड्रग तस्करीप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. उत्तर मुंबईत ड्रग विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाने एमडी ड्रगची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून सवाचार लाखांचे एमडी जप्त केले. त्यानंतर गोरेगाव, मालवणी, एमएचबी आणि चारकोप पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून 993 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या ड्रगची किंमत सुमारे 4 लाख 51 हजार रुपये इतकी आहे.