
उत्तर प्रदेशातील अयोध्येत सुरू असलेल्या प्रभु श्रीरामांच्या भव्य मंदिरात आतापर्यंत 45 किलोग्राम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. प्रभु श्रीरामांच सिंहासन आणि मंदिराच्या तळमजल्यावर असलेल्या 14 दरवाजांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. अजूनही काम सुरू असून बरचं काम अद्याप बाकी आहे. परंतु आतापर्यंत वापरण्यात आलेल्या 45 किलो सोन्याची किंमत 50 कोटी रुपये आहे.
प्रभु श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्रा यांनी मंदिरामध्ये सुरू असेलल्या कामाची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराची मुख्य रचना जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु सभागृह, अतिथीगृह आणि संग्रहालय यासह इतर भागांचे बांधकाम बाकी असून त्याचे काम सुरू आहे. डिसेंबर 2025 पर्यंत हेही बांधकाम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आतापर्यंत मंदिरासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची किंमत 50 कोटी रुपये इतकी आहे. ज्यामध्ये कराचा समावेश नाही. मंदिर समितीच्या इतर सदस्यांनी सुद्धा याबाबत माहिती दिली. गुरुवारी (5 जून 2025) मंदिर परिसरात एकून सात मूर्तींचे अभिषेक करण्यात आले. पहिल्या मजल्यावरील गर्भगृहाच्यावर मध्यभागी प्रभु श्रीरामांच्या दरबाराची स्थापना करण्यात आली आहे. तसेच उत्तरेला मध्यभागी अन्नपू्णा, दक्षिणेला मध्यभागी बरजंगबली, ईशान्य दिशेला शिवलिंग, आग्नेय दिशेला गणपती बाप्पा, नैऋत्येला सूर्यदेव आणि वायव्येला भगवती मातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.