मानखुर्दमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

robber woman detained mandala chembur tension mumbai police

मानखुर्दमध्ये राहत्या घरात गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत्यूपुर्वी त्याने कुठलीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. 29 वर्षीय तरुण मानखुर्दच्या साठे नगरात राहत होता. तो एक दुकान चालवत होता.

घराचा दरवाजा आतून बंद असल्याने मुलाच्या वडिलांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता तरुण गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. गळफास घेण्यापूर्वी त्याने दरवाजा आतून बंद केला होता. त्याने ओळखीच्या कोणाला तरी पैसे दिले होते. ते पैसे त्याला परत करण्यात आले नाहीत. त्याची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत सापडला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे मुलाच्या वडिलांचे म्हणणे असल्याचे समजते. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.